रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोनाचे ७ रुग्ण ठार

0
271

गुरुग्राम, दि.०२ (पीसीबी) : हरयाणातील गुरुग्राम येथील सेक्टर ५६ मधील कृती रुग्णालयात शुक्रवारी रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कमीतकमी १७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. काही कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयाबाहेर निषेधही केला. प्रकरण शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले.

सेक्टर ५६ पोलिस स्टेशनचे अधिकारी दलपतसिंग म्हणाले कि, “घटनेची आम्हाला सूचना मिळाली आहे आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांना शांत करण्यासाठी ठाणे सेक्टर-५६ मधील एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले.” तपासणीनंतर मृत्यूची कारणे शोधली जातील. अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

सुमारे २० कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रुग्णांची प्रकृती खालावू लागली आणि रुग्णालय व्यवस्थापनाने आम्हाला द्रव ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल माहिती दिली नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकानी सांगितले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांकडून कळवल्यानंतरच रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर व डॉक्टरांची व्यवस्था करता येऊ शकते, असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. रुग्णालयात उपस्थित रूग्णाच्या नातेवाईकांपैकी एकाने सांगितले, “रुग्णालयाच्या बाजूने ही घोर दुर्लक्ष होते.” सुमारे २० कोविड रुग्णांना ऑक्सिजन बॅकअपविना रुग्णालयात दाखल केले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल काहीही सांगितले नाही. दोषींवर कडक कारवाई केली जावी.