बेळगावात सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने; अंगडी-जारकीहोळींत यांच्यात 9 हजारांचा फरक

0
323

बेळगाव, दि.०२ (पीसीबी) : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आटा समोर आलेल्या आकडेवारीवरून अंगडी-जारकीहोळींत यामध्ये पुन्हा 9 हजारांचा फरक राहिला आहे

सतीश जारकीहोळी : 167054
मंगला अंगडी : 176512
शुभम शेळके : 45721