राहुल गांधी भडकले, म्हणाले…

0
415

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : चीनी सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारले आहेत. पंतप्रधान गप्प का आहेत ? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून केली आहे.

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे.भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती दुपारी समोर आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती.