राहुल गांधींनी राजीनामा दिल्यास काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील – पी. चिदंबरम

0
417

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या अध्यक्ष पदाचा  राजीनामा देऊ नये, अन्यथा दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील, असे भावनिक आवाहन काँग्रेस नेते आणि  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.

दिल्लीत शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत   राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा  राजीनामा सादर केला होता. परंतु त्यांचा राजीनामा फेटाळला होता.  या बैठकीत    नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. तसेच त्यांना पदावर कायम राहण्याची विनंती  केली.

भूतकाळातही काँग्रेसचा पराभव झाला आहे, पण पक्ष पुन्हा सावरला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा विचार सोडावा,  असे चिंदबरम् यांनी म्हटले आहे. पक्षाला पुन्हा मजबूत करुन लोकांचा विश्वास संपादन करु. त्यासाठी राहुल गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान,  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या आहेत.  तर बहुतांशी राज्यात काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. तसेच महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे.