स्मृती इराणींच्या विश्वासू कार्यकर्त्याची अमेठी येथे घरात घुसून गोळ्या झाडून हत्या

0
458

अमेठी, दि. २६ (पीसीबी) – भाजप खासदार स्मृती इराणी यांच्या विश्वासू  कार्यकर्त्याची अमेठी येथे  घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  सुरेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. अमेठीतील बरौलिया गावाचे ते प्रमुख होते. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  

शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली . उपचारासाठी त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  दरम्यान घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात  केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. इराणी यांच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांच्या विजयासाठी फायदा झाला होता.