राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांनो घरवापसी करा; अजितदादा पवारांची साद

0
556

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मागील निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून गेले आहेत, त्यांच्यासाठी अजूनही पक्षाची दारे उघडी आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजितदादा पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना साद घातली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक जुने सहकारी घरवापसी करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजितदादा गुरूवारी (दि. २७) डोंबिवलीतील एका कार्यक्रमासाठी गेले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा येण्याची साद घातली आहे.