राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर

0
1343

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादी  काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी आज (शनिवार) याबाबतची घोषणा केली.

पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला होता. वाघ भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.