कारगील विजय दिनानिमित्त मराठवाडा चॅरीटेबल समितीच्या वतीने शहीद जवानांना श्रध्दांजली

0
637

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – कारगील विजय दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कारगील युध्दात शहीद झालेल्या सैनिकांची आठवण राहावी, या भावनेतून  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कारगील युध्दाच्या स्मृतींना उजळा देण्यात आला.

कारगील युध्दात हिंदुस्थानच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले. व आम्हा हिंदुस्थानियांची मान उंच केली. दक्ष राहण्याचा निश्चय हीच त्या संग्रामातील हुताम्यांना आदरांजली, असे मनोगत श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दामोदर पतंगे यांनी व्यक्त केले.

यावेळी मराठावाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, प्रा. घोडके, हिरास, प्रीती काळे, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, भूगोल फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव वाळूंज,  साहेबराव गावडे, उद्योजक राठोड, मोरे, शशिकांत दुधारे, रमेश जाधव, शिवलाल कांबळे, आण्णा जोगंदड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सुर्यकांत कुरूलकर यांनी केले. तर आभार प्रकाश इंगोले यांनी मानले.