राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात?  

0
563

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेतला जाऊ नये, अशी विचारणा निवडणूक आयोगाने  राष्ट्रवादी काँग्रेससह तीन राष्ट्रीय पक्षांना केली आहे. याबाबत या पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांना ५ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास  बजावले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला किमान  ४ राज्यांमध्ये कमीत कमी ६ टक्के मते मिळणे अनिवार्य आहे. किंवा लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान ३ राज्यांमध्ये कमीत कमी २ टक्के जागा मिळणे बंधनकारक आहे. किंवा कमीत कमी चार राज्यांमध्ये पक्षाला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळायला हवा.

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल आणि भाकप वरीलपैकी कोणत्याही निकषांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो.   दरम्यान,  या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यास भाजप, काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसप) हे  ५  राष्ट्रीय पक्ष राहतील.