राष्ट्रवादीला धक्का; बीडमधील ‘हा’ नेता शिवसेनेच्या वाटेवर  

0
479

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  बीडमधील राष्ट्रवादीचे नेते व आमदार  जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यामुळे त्यांचा  शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  मोठी खळबळ उडाली आहे.

क्षीरसागर यांनी  राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ होणार असल्याची चर्चा  सुरू  झाली असून राष्ठ्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान,  क्षीरसागर यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांना मदत करण्याची  भूमिका घेतली आहे.  तर  त्यांनी १८ एप्रिलला निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.