ब्राम्हण समाजाविरोधात वादग्रस्त विधान केल्याने खासदार राजू शेट्टी विरोधात गुन्हा

0
492

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – ब्राम्हण समाजाविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने हातकणंगले पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे प्रचार सभेवेळी शेट्टी यांनी सीमेवर लढणार्‍या जवानांच्या संदर्भात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी ब्राम्हण समाजाच्यावतीने निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारे निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांना नोटीस पाठवली होती. नोटिसीला उत्तर न दिल्याने निवडणूक विभागाचे भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख मेघराज घोडके यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली फिर्याद दिली. त्यानुसार, शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.