राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले यांचा आमदारकीचा राजीनामा   

0
599

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे  आज (मंगळवार) सकाळी सुपूर्त केला. यामुळे आता शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश निश्चित  मानला जात आहे.

शिवेंद्रराजे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.  यापूर्वी त्यांनी  आज  सकाळी मुंबईत जाऊन  राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला.

रविवारी शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानावर नगर विकास आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची  बैठक झाली.  या बैठकीत सर्वांनीच  त्यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह केला . त्यावर त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले असून पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगितले.