राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर

0
811

पुणे, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन  बंद खोलीत तासभर चर्चा केली. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

या भेटीविषयी  बांदल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या दोघांमध्ये  राजकीय  चर्चा झालेली  नाही.   शरद पवार साहेबांनी मला विधानसभेच्या उमेदवारीबाबत शब्द दिलेला आहे. त्यामुळे पवारसाहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी केवळ शिवाजीराव आढळराव  यांच्याशीच नाही, तर माझी मुख्यमंत्र्यांसोबत देखील अर्धा तास  चर्चा  झाली  आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्षाला सोडून जात आहेत. त्यामुळे  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत वैभव पिचड, रश्मी बागल, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप   शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.