राष्ट्रवादीचे नेते धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी

0
373

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर   राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.  आज (शुक्रवार)  मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा आणखी धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत राष्ट्रवादीकडून त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. याच कारणांमुळे खासदार भारती पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली होती. मात्र धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे महाले यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  तसेच ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, राष्ट्रावादीची गळती कायम आहे.  माजी मंत्री सचिन आहिर आणि महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश केला होता.