राष्ट्रवादीचे नवाब मलिक विरोधातील मानहानीचा दावा गिरीश बापटांनी घेतला मागे; राजकीय चर्चांना उधाण

0
830

पुणे, दि. १४ (पीसीबी) –  तूरडाळ घोटाळा केल्याचा आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरील मानहानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज (शुक्रवार) मागे घेतला. गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक दोघेही आज शिवाजीनगर कोर्टात हजर होते.

जीवनाश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या तूरडाळीच्या साठ्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आल्यानंतरच राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जप्त केलेल्या डाळीचा जाहीर लिलाव करण्याचे ठरवले, असे सांगत, यात दोन हजार कोटींचा घोटाळा झाला असून, त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा सहभाग आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.

यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्या विरोधा शिवाजीनगर कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र आज बापट यांनी तो दावा मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.