राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांचा गाडीला अपघात

0
551

जळगाव, दि. २ (पीसीबी) – एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णासाहेब सतीश पाटील यांचा गाडीला आज (रविवारी) सकाळी अपघात झाला. या अपघातात आमदार सतीश पाटील यांच्यासह चार जण सुदैवाने बचावले. जळगावातील पाळधी चौफुलीजवळ मोटर सायकलस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

मोटार सायकलस्वरास वाचण्याच्या प्रयत्नात गाडी रस्ता सोडून खाली गेली. बाजूला असलेल्या ईलेट्रीक तारेवर गाडी अडकली. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत. मंत्री   गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी  धाव घेत मदतकार्याला सुरूवात  केली.  स्थानिक नागरिकही मदतीला धावून आले.

आमदार सतीश पाटील हे आपल्या चार सहका-यांसोबत पारोळ्याला जात होते. रवांजे फाट्याजवळ पाटील यांची गाडी आली असता त्यांच्या गाडीसोमोर एक दुचास्वार आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रसत्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातात गाडीतील सर्वजण सुखरुप  आहेत.