रावसाहेब दानवे यांचा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

0
485

मुंबई, दि,१६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुका समोर असताना काँग्रेस बरोबरच आता भाजपामध्ये सुद्धा बदलाचे वारे वाहत आहेत. रावसाहेब दानवे यांनी आपल्या प्रदेशध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात सामिल करुन घेतले होते. तेव्हा पासूनच प्रदेशध्यक्ष पद सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती, आज या चर्चेसा पुर्णविराम लागला आहे.

राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता भाजप लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेके नेते आहेत. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख ,ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे.