“रावण टोळीतील” कुख्यात सागर वाघमोडे दोन वर्षांसाठी तडीपार

0
842

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – खुनाचा प्रयत्न, धमकावणे, दरोडा, मारामारी या सारखे असंख्या गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात रावण टोळीतील गुंड सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे (वय २३, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.