राधाकृष्ण विखे-पाटलांची पुतणी नीला विखे पाटील स्वीडन पंतप्रधानांच्या सल्लागारपदी

0
2103

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.  ३२ वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.

स्वीडनचे पंतप्रधान  स्टीफन लोफवन यांनी जानेवारीत आपल्या पदाचा कार्यभार  स्वीकारला आहे. त्यांचा कार्यलयात नीला  आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहणार आहेत, असे अशोक विखे पाटील यांनी  सांगितले.

स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात  तर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.

नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले  आहे. माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.