राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; विधानसभा निवडणुकाबाबत चर्चा?  

0
407

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवारी)  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे ४५ मिनिटे  चर्चा केली.  शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे  झालेल्या या  भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.   

मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतर राज ठाकरे शरद पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या  चर्चा सुरू झाल्या आहेत.  लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर  मंगळवारी मुंबईत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या बैठकीत  मनसेला बरोबर घ्यावे, असा सूर महाआघाडीच्या नेत्यांनी आळवला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत  राज ठाकरे यांनी पंतप्रधान  मोदी व अमित शहा  यांच्या विरोधात प्रचारसभा घेऊन राळ उठवली होती. ‘लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्य चांगलेच गाजले होते तथापि प्रत्यक्षात राज यांच्या भाषणांमुळे मतांमध्ये परिवर्तन होऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर मुंबईसह राज्यात राज यांनी जेथे जेथे प्रचार केला त्यातील बहुतेक जागी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला.