राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा गुन्हा

0
718

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – राज्यातील करोडो रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अध्यक्ष पी.आर.पाटील यांच्यावर सहकारी महिला कॉन्सटेबलने लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे सध्या नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख  देखील आहेत.

याप्रकरणी २८ वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे.

कामाच्या जागी महिलांच्या छळाच्या तक्रारीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, जारी करण्यात आलेल्या विशाखा गाईडलाइन्सनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबललने औपचारिक तक्रार दाखल केली. मुंबईस्थित एका महिला अधिकाऱ्याच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये पाटील दोषी आढळल्याने त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसीबीचे राज्य समन्वयक पोलीस महानिरिक्षक संजय बर्वे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.