राज्यातील जनतेची घोर निराशा करणारा खोटी स्वप्ने दाखवणारा १६ लाख कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प – काशिनाथ नखाते

0
194

पुणे, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून स्थिती बिघडलेली आहे, विकासदर महाविकास आघाडी असताना ९.१% होता त्यात २.३ घट होऊन ६.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अहवाल आहे. यास अनुसरून अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा होत्या, महाराष्ट्र राज्यातील कामगारांसाठी ठोस काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांची निराशा झाली आहे. राज्यातील उद्योगांसाठी ९३४ कोटीची घोषणा अत्यंत अल्प आहे. रोजगार निर्मितीसाठी ११६५८ कोटी रुपयांची निधी हा यापूर्वी प्रमाणे हे प्रत्यक्षात विनियोग होईल असे दिसत नाही. कोरोना नंतर उद्योग – व्यवसाय वाढीसाठी व रोजगार वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे होते मात्र तसे प्रत्यक्ष दिसत नाही .नवीन महामंडळाबाबत काही घोषणा करण्यात आल्या मात्र यापूर्वीही अशा घोषणा झाल्या होत्या मात्र प्रत्यक्षात निधी न दिल्याने पुढे कुठलेही कामकाज झालेले नाही.

यापूर्वीचेअर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वढू बुद्रुक येथील स्मारकासाठी यापूर्वीच निधी जाहीर केलेला आहे त्यालाच नवीन मुलामा लावण्यात आलेला आहे. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी ठरलेली असून जे ८ वर्षात झाले नाही घरे मिळालीच नाहीत ते एका वर्षात दहा लाख घरांचा महत्वकांक्षी प्रकल्प हा केवळ दिवा स्वप्नच ठरणार आहे.अनेक स्मारकासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले ? व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल जागेवरील स्मारकाचे काय झाले ? आता ७४१ कोटी देणारं मग यापूर्वी ३९४ कोटी दिले त्याचे काय झाले ? हा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे. शेतकऱ्यावरती घोषणांचा पाऊस करून खुश करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

भिडेवाडा स्मारक जागान्यायप्रविष्ठ आहे येथील दुकानदार व जागेचा गुंता सोडवणे मोठा कालावधी जाऊ शकतो ते न करताच निधी देऊन काम होणार नाही. १६२२२ कोटी रुपयांचा महसूल तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे मात्र हा पुढे 1 लाख कोटीचा तुटीचा हा अर्थसंकल्प होऊ शकतो. त्यामुळे केवळ महाराष्ट्राच्या जनतेला अमृतकाल, पंचामृत म्हणून खोटी दिवास्वप्न दाखवण्यात आले आहे.