राजमाता इंदुताई अन्नपूर्णा योजनेतून बार्शीतील सर्व हॉस्पिटलमध्ये पेशंट व नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था

0
504

 

बार्शी, दि.३१ (पीसीबी) – कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना देखील मदत करण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस मुळे शासनाने दिलेल्या आदेशाने सर्व सामान्य परिवाराच्या मदतीच्या स्वरूपात बार्शी येथील देवणे गल्ली सोमवार पेठ येथे गेल्या दोन वर्षापासून मा.पोलिस अधिकारी तसेच बार्शीचे शिवसेने नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी गोरगरिबांसाठी रात्री कोणीही उपाशी झोपू म्हणून भाऊसाहेब आंधळकर यांनी राजमाता इंदूताई मोफत अन्नपूर्णा योजनेची गेल्या दोन वर्षापासून कुठेही खंड न पडता चालत आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये

याकरिता राजमाता इंदुताई अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून भाऊसाहेब आंधळकर स्वतः आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते विभागात जाऊन रोज सकाळी ५०० आणि संध्याकाळी ५०० लोकांना सकाळी ७ ते सायंकाळी १० या वेळेत गोरगरिब लोकांना जेवण पुरवत आहेत. बार्शी शहरातील सर्व हॉस्पिटलमधील पेशंट नातेवाईक गोरगरीब उपाशी राहू नये म्हणून दोन वेळेस जेवणाची सोय व चहाची देखील सोय केल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.