रहाटणीत टायरचे गोदाम फोडून तीन लाखांचे टायर आणि बॅटऱ्या चोरीला

0
509

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – टायरचे गोदाम फोडून चोरट्यांनी तीन लाखांचे टायर आणि बॅटऱ्या चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. ८) सकाळी नऊच्या सुमारास रहाटणीतील साई चौकातून उघडकीस आली.

याप्रकरणी आश्रफ अन्वर अत्तार (वय २७, रा. गणराज कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तार यांचे रहाटणीतील साई चौकात मेट्रो टायर्स नावाने गोदाम आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास गोदाम कुलूप लावून बंद करण्यात आले. चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून चारचाकी, दुचाकी वाहनांचे टायर, बॅटऱ्या असा ३ लाख १० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी गोदाम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. फौजदार पी. एम. चौगुले तपास करत आहेत.