रहाटणीत अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पत्नीवर पतीने केले चाकुने वार; स्वता:वर ही वार करुन केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न

0
787

वाकड, दि. २ (पीसीबी) – अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पत्नीवर पतीने चाकुने प्राणघात वार केले. त्यानंतर स्वत:च्या पोटावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.२९) रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटणी नखातेवस्ती येथील बळीराज कॉलनी नं.२ येथे घडली.

भावना दिनदयाळ बावनकर असे चाकुचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर दिनदयाल बाबुलाल बावनकर (रा. बळीराज कॉलनी नं.२, रहाटणी, नखातेवस्ती) असे जखमी पतीचे नाव आहे. याप्रकरणी चित्रलेखा गजानन सुर्यवंशी (वय ५१, रा. राजगड कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना आणि दिनदयाल हे पती-पत्नी आहेत. दिनदयाल यांचे त्यांची चुलती योगीता सोबत अनैतिक संबंध होते. भावना त्यांच्या या संबंधात अडथळा ठरत होती. यावर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी दिनदयाल याने चाकुने भावनाच्या गालावर, छातीवर, मांडीवर, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. यानंतर भावना बेशुध्द पडली. तर आरोपी दिनदयाल याने स्वत:च्या पोटावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भावना ही शुक्रवार आणि शनिवारी रुग्णालयात बेशुध्द अवस्थेत होती. शुध्दीवर आल्यानंतर तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार आरोपी पती दिनदयाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बांगर अधिक तपास करत आहेत.