रविवारी चिंचवडला बारणे, वाघेरेंंची प्रकट मुलाखत

0
202
  • -दिशा फाऊंडेशनचा उपक्रम, मावळ लोकसभेचा रणसंग्राम

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी, २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे मावळचे घोषित उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट), प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित मतदारसंघ मानला जातो. येथील विविध मुद्द्यांचा राजकीय अंगाने परामर्ष घेण्यासाठी मावळ लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश असून काही जागा राखीव असणार आहेत.