रणवीर-दीपिका कोंकणी पद्धतीने विवाहबंधनात

0
1155

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण   पारंपरिक कोंकणी पद्धतीने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात आज (बुधवार) अडकले. इटलीतील लेक कोमो येथील नयनरम्य व्हिलामध्ये हा लग्न सोहळा पार पडला. गेल्या दोन दिवसांपासून इतर विधींना सुरुवात करत मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला.  लेक कोमो परिसरात कडेकोड सुरक्षाव्यवस्था असून राजेशाही थाटातील लग्नविधीचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. 

कोंकणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर गुरुवारी सिंधी पद्धतीने दीप- वीर विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकाने पाहुण्यांना घातली असल्याचे सांगितले जात आहे.

दीप- वीरच्या संगीत समारंभात गायिका हर्षदीप कौरने अनेक गाणी सादर करत चार चाँद लावले. या लग्नानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. यावेळी  संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे.