‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका चहामध्ये भेसळ असल्याचे झाले सिद्ध

0
1047

पुणे, दि.२१ (पीसीबी) – ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका  दिला आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी देखील येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासनाने येवले चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते. या जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो. केंद्रीय प्रयोग शाळेने हा अहवाल दिला आहे.