“येत्या हिवाळी अधिवेशनात ‘या’ नेत्यांची नावे जाहीर करणार; त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल”

0
592

मुंबई, दि.२९ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून देशभर आर्यन खान ड्रग्स प्रकरण खूप गाजतंय. नवाब मलिक आणि NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यात शाब्दिक वार होताना दिसत आहेत. तरी आता नवाब मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल”, असं खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे हे नेते कोण? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

नवाब मलिक पुढे असंही म्हणाले कि, “गेल्या महिन्याभरापूर्वी जी परिस्थिती होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड वानखेडेंना भेटत आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे. हे उघड होईल, असं सांगतानाच येणारं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेत मी जे काही समोर आणणार या राज्यात ते नेते तोंड दाखवू शकणार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. अधिवेशनात माझं नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी विषय डायव्हर्ट करावा म्हणून प्रयत्न होईल. पण मी कुणाचं नाव घेऊन मी विषय डायव्हर्ट करणार नाही. पण हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पोर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चालवतो. त्याला अटक का केली नाही? ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीचा आयोजकची पार्श्वभूमीच ड्रग्ज रॅकेटची असताना त्या अँगलने तपास का केला नाही? असा सवाल करतानाच पार्टीतील 1300 लोकांचा तपास का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. मी काही लोकांची पोलखोल केली आहे. त्यामुळे माझे वडील भंगारवाला होते म्हणून मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक बुडली नाही. सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही”, असा शब्दात मलिक यांनी सुनावले.