युतीसाठी लॉबिंग; अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह मातोश्रीवर येणार  

0
629

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे, तशीतशी भाजप शिवसेनेची युती होण्यासाठी हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. युतीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीतील भाजपचे राष्ट्रीय नेते ‘मातोश्री’ वर  येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.   

लोकसभा आणि विधानसभेसाठी युती करण्यासाठी   भाजपने जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. त्यासाठीच  भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे.  त्यामुळे येत्या काही दिवसात युतीच्या चर्चांचा जोर येणार आहे. तर  सध्या शिवसेना भाजपमध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी ५०-५० जागवाटपाच्या फॉम्युर्ल्यावर  चर्चा  सुरु असल्याची समजते.