‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाने हेरलं; मुलगी आणि जावईही आले पॉझिटिव्ह

0
193

केरळ, दि.०९ (पीसीबी) : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांची मुलगी आणि जावई यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. विजयन म्हणाले की, मला कोरोनाची लागण झाली आहे. मी कझिकोड मेडिकल रुग्णालयात दाखल असून माझ्यावर उपचार सुरू आहेत. तसेच्च आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. विजयन यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला होता. तसेच ३ मार्च रोजी त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही घेतला होता होता.