या नेत्याला मुख्यमंत्री करा तरच राजीनामे परत घेऊ; काॅंग्रेसच्या आमदारांची मागणी

0
458

कर्नाटक, दि ८ (पीसीबी) – कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारचे ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.  या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला काठावर बहुमत असेल, त्यामुळे कुमारस्वामी सरकार कधीही कोसळण्याची शक्यता आहे. जर सिद्धरामय्या यांना मुंख्यमंत्री बनवत असाल तर आम्ही आमचे राजीनामे परत घेऊ, असे कर्नाटमधील राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या आमदारांनी सभापतींकडे राजीनामे सादर केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्‍थिरता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे एचडी कुमारस्‍वामी यांच्या नेतृत्‍वाखालील जेडीएस काँग्रेसची आघाडी असलेले सरकार धोक्यात आले आहे. ज्या काँग्रेस आमदारांनी पक्षाचा राजीनामा सादर केला आहे, त्‍यामध्ये माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्‍या गटाच्या नेत्‍यांचा समावेश आहे.

दरम्यान, २०१८ च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजपला रोखण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सरकार बनवले होते. मात्र या दोघांमध्ये कधी म्‍हणावे तसे पटले नाही.