जेजुरीत दोन एकुलत्या एक मुलांचा पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून मृत्यू

0
411

जेजुरी, दि. ८ (पीसीबी) – तलावातील खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन एकुलत्या एक मुलांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान जेजुरी येथील पेशवे तलावात असलेल्या खड्ड्यात घडली.

आदर्श मनोहर उबाळे (वय ७, रा. जुनी जेजुरी) आणि आदित्य संभाजी कोळी (वय ८, सध्या रा. जुनी जेजुरी, मूळगाव देवळाली, ता. कळंब, जि उस्मानाबाद) असे मृत दोघा चिमुकल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, रविवारी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान आदर्श आणि आदित्य हे दोघे चिमुकले पेशवे तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ ते न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता त्या दोघांचे कपडे पेशवे तलावातील पाण्याने भरलेल्या खड्ड्या जवळ आढळून आले. यावर नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने आदर्श आणि आदित्य या दोघांना बाहेर काढले. आणि जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला होता.

आदर्श हा पहिलीत, तर आदित्य हा जुनी जेजुरी येथे तिसरीत शिकत होता. ते आपल्या आई-वडिलांना एकुलते एक मुले होते.