“या” जागेवर स्थलांतरित होणार शिवाजीनगर बस स्थानक

0
986

पुणे, दि.३० (पीसीबी) – पुणे महामेट्रोच्या कामामुळे मंगळवारपासून पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बस नियमित वेळापत्रकानुसार वाकडेवाडी येथून सुटणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरून मेट्रो धावणार असल्याने, शिवाजीनगर बस स्थानक येथील जमिनीखालून मेट्रोचे स्थानक होणार आहे. या कारणामुळे हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रोचे काम सुरु होण्यापूर्वीच वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेमध्ये नवीन बस स्थानक उभारणीचा निर्णय घेण्यात आला. काही अडचणींमुळे कामास विलंब झाला असला तरी अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे.