‘या’ कारणास्तव चालू होता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ

0
193

वाकड, दि. १४ (पीसीबी) – इस्त्रीचे दुकान टाकण्यासाठी आणि इतर घरगुती कारणांसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची फिर्यादी वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सासरच्या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 मे 2006 ते 13 एप्रिल 2021 या कालावधीत रहाटणी आणि चिंचवडगाव येथे घडला.

लक्ष्मण मुरलीधर जाधव (वय 38), मुरलीधर रामा जाधव (वय 65), अलका मुरलीधर जाधव (वय 56), श्रीराम मुरलीधर जाधव (वय 40), शीतल श्रीराम जाधव (वय 37), नारायण मुरलीधर जाधव (वय 32), मंगल नारयण जाधव (वय 30) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे इस्त्रीचे दुकान टाकण्यासाठी तसेच इतर घरगुती कारणांवरून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.