यमुनानगरमध्ये गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून टोळक्यांची दुकानावर दगडफेक

0
987

निगडी, दि. १७ (पीसीबी) – निगडी यमुनानगर येथील एका किराणा मालाच्या दुकानदाराने गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी शिवीगाळ करत दुकानावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१६) रात्री साडेनऊच्या सुमारास यमुनानगर येथील माताजी सुपर मार्केट या दुकानात घडली.   

याप्रकरणी दुकान मालक रमेश आर. जलोट (वय ३३, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुकानाचे मालक रमेश जलोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून साते ते आठ जणांच्या टोळक्यांनी रमेश यांच्या निगडी यमुनानगर येथील माताजी सुपर मार्केट या दुकानावर दगडफेक करुन दुकानाच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच रमेश यांना शिवीगाळ करुन पसार झाले. रमेश यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.