…म्हणून संजय काकडेंची मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ

0
2942

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ३ मार्गिकेचे आज (मंगळवार) भूमिपूजन  करण्यात आले. मात्र, भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे हे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने अनुपस्थित राहिल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.

दरम्यान,  महापौर मुक्ता टिळक यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला होता. त्यानंतर आज खासदार संजय काकडे यांनीही याच कारणावरून कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.

अशा कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाते. मात्र,  राष्ट्रवादीच्या लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे आणि राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांना मात्र आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीसह  भाजपमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे.