…म्हणून त्याने केली गरोदर पत्नीला बेदम मारहाण

0
214

पिंपरी, दि. 17 (पीसीबी):फोन करत नसल्याच्या कारणावरून पतीने गरोदर पत्नीला मारहाण केली. तसेच तिला बेडवर जोरात आपटून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला. हा प्रकार 12 जानेवारी रोजी सकाळी पावणे बारा वाजता अनंतानगर, लक्ष्मीचौक, हिंजवडी येथे घडला.

धीरज राजेंद्र डमरे (रा. अनंतानगर, लक्ष्मीचौक, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत जखमी पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पत्नी तिच्या आरोपी पतीला फोन करत नव्हती, त्याचा राग पतीच्या मनात होता. त्यावरून त्याने चिढून जाऊन पत्नीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे माहिती असताना त्याने पत्नीला बेडवर जोरात आपटून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला. त्यात पत्नी जखमी झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.