मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश

651

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी  सुप्रसिद्ध मॉडेल हसीन जहाँ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांचे स्वागत केले. जहाँ यांनी  काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

जहाँ आणि मोहम्मद यांच्या नात्यात दुरावा आला आहे. जहाँ यांनी मोहम्मद यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेत दहा लाख रुपये महिना पोटगी देण्याची मागणी केली होती. या दोघांमधील मतभेद विकोपाला गेले होते.

दरम्यान, मोहम्मद यांनी आपल्या जीवितास जहाँ यांच्याकडून धोका असल्याचे म्हटले होते. दोघांमध्ये समझोता होण्याची शक्यता वाटत होती. मात्र, हे दोघेजण विभक्त झाले आहेत.