मोशीत व्हिडीओ शुटींग केल्याचा जाब विचारल्याने ट्रक चालकाला जबर मारहाण

0
580

मोशी, दि. ५ (पीसीबी) – ट्रक गोडाऊनमधून बाहेर काढत असताना बापलेकाने ट्रकची व्हिडीओ शुटींग केली. यामुळे ट्रक चालकाने व्हिडीओ शुटींग का केली असा जाब त्या बापलेकाला विचारला. यावर चिडलेल्या बापलेकाने ट्रक चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.४) दुपारी साडेतीनच्या सुमारास गट क्र. २५६, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

अय्याज अतिकुल रेहेमान चौधरी (वय २९, रा. महिंद्र अंथिया, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोविंद करसण पटेल (वय ४८, रा. व्दारका सोसायटी, समोर इंद्रायणीनगर भोसरी) आणि त्यांचा मुलगा यश पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गट क्र. २५६, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथून अय्याज यांनी त्याच्या मालकीचा ट्रक गोडाऊन मधून बाहेर काढला. यावेळी आरोपी गोविंद आणि त्याचा मुलग यश याने त्यांच्या ट्रकची व्हिडीओ शुटींग केली. यावर अय्याज याने माझ्या ट्रकची व्हिडीओ शुटींग का केली असा जाब गोविंद आणि त्याचा मुलग यश या दोघांना विचारले. यावर त्या दोघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अय्याज यांना जबर मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.