मोरवाडीतील राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
666

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – राहत्या घरातील छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास पिंपरीतील मोरवाडी येथे घडली.

इस्माईल अब्दुलशाकुर शेख (वय २७, रा. मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास इस्माईल यांनी त्यांच्या राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती काही शेजाऱ्यांना कळाली. त्यांनी तातडीने इस्माईल याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. इस्माईलने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकलेले नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.