मोरया गोसावी मंदिरातून मंगलमूर्ती द्वारयात्रेला सुरूवात

0
801

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री मंगलमूर्ती द्वारयात्रेला आज (गुरूवार) पासून प्रारंभ झाला. चार ऑगस्ट रविवारी द्वार यात्रेचा समारोप होईल . श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसा पासून चारदिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वार यात्रा काढली जाते.

द्वारयात्रेच्या काळात रोज सकाळी मंगलमूर्ती वाड्यातून देव महाराज यांच्या समवेत असंख्य भाविकां बरोबर वाजत गाजत यात्रा काढली जाते . श्री मोरयागोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेची सुरवात होते . द्वार ठिकाणी पोहोचल्यावर देवता पूजन ,जागरण ,गोंधळ व जोगवा असे धार्मिक विधी केले जातात .

पहिल्या दिवशी (गुरवार ) पूर्वद्वार श्री मांजराई देवी पिंपरी  , दुसऱ्या दिवशी (शुक्रवार ) दक्षिणद्वार श्री आसराईदेवी वाकड , तिसऱ्या दिवशी (शनिवार ) पश्चिम द्वार ,ओझराई देवी रामाडी डोंगर रावेत  आणि चोथा दिवस उत्तर द्वार (रविवार ) श्री मुक्ताई देवी ,आकुर्डी अशी यात्रा काढली जाते.