लवकरच सेनेत होणार मेगा भरती; कॉंग्रेसचे दिग्गज नेते सेनेच्या वाटेवर

0
643

मुंबई, दि. १ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पराभव बघितल्याने काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यानी विकासाचा मुद्दा समोर करत भाजपात पळ काढला आहे. काल बुधवार (दि.३१जुलै) मुंबईमध्ये मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर आता कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनीही मुलाखतीकड पाठ फिरवली आहे. हे सर्व नेते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षात आता इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. कॉंग्रसनेही मुंबईत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात या मुलाखतीला मुंबईतील काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग, ( कलिना ) असलम शेख (मालाड), वर्षा गायकवाड ( धारावी ), अमिन पटेल ( मुंबादेवी ) यांनी कॉंग्रेसच्या मुलाखतीला येण्याचे टाळले. कृपाशंकर सिंग भाजपत तर असलम शेख शिवसेनेत जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यातच इतर पक्षांमधूनही शिवसेनेत काही नेते जाणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा शिवसेना – भाजप युतीतच लढवणार आहे त्यामुळे शिवसेनेने मुंबईच्या वाट्याला येणारे मतदारसंघ मजबूत करण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील काही मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचं कुटुंबही शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालंय. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.