“मोदी सरकारच्या मग्रुरी विरोधात आम्ही हा बंद पुकारला. आता आम्ही मोदी….”

0
278

सोलापूर, दि.११ (पीसीबी) : हमारा कोई बिघाड नही सकता असं मोदी सरकारला वाटत आहे. मोदी सरकारच्या या मग्रुरी विरोधात आम्ही बंद पुकारला असून आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आज बंद पुकारण्यात आला. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप आणि मोदी सरकारला हमारा कोई बिघाड नही सकता असं वाटतं. ज्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याने दुसरीकडे उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. इतकं हे सरकार निगरगट्ट झालं आहे, सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहून आम्ही काय काय करू शकतो ते सरकारकडून दाखवण्याचा प्रयत्न आहे, सरकारच्या मग्रूर पणाच्या विरोधात बंद पुकारला आहे, असं प्रणिती म्हणाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्याविरोधात निषेध म्हणून मौन आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कामगार संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. बंदही यशस्वी झाला आहे. बंदला काही भाजपच्या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, त्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत. त्यांचा विरोध आहे. मोठ्या संघटनांचा बंदला पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे. बंद पुकारल्यानंतर लोक स्वत: समोर येऊन पाठिंबा देत आहेत. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. देशातील शेतकरी बंदकडे पाहत आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना 400 पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरयाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. बंद सुरू आहे. बंद शंभर टक्के यशस्वी आहे, असं राऊत म्हणाले.

बंद दरम्यान बसेस फुटतील. पण कोणत्या बसेस फुटल्या माहीत नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे, असं सांगतानाच तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने बंद होण्याने उतरले आहेत. लोक बंदमध्ये उत्सफूर्तपणे उतरले आहेत. बंदमध्ये ज्या काही किरकोळ घटना घडतात त्या जगभरात होत असतात, असंही राऊत म्हणाले.