मोदी-शहांना पुन्हा सत्ता मिळाली, तर राहुल गांधी जबाबदार – अरविंद केजरीवाल

0
480

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – केंद्रात  मोदी-शहा यांना पुन्हा  सत्ता मिळाली,  तर त्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच जबाबदार असतील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ‘आप’च्या जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी  केजरीवाल यांनी ‘आप’शी आघाडी न होण्यास काँग्रेसचा आडमुठेपणा कारणीभूत आहे, असा आरोप केला.

केजरीवाल म्हणाले की, कुठलीही राजकीय आघाडी ट्विटरवरून केली जाते,  हे राहुल यांनी सांगावे. काँग्रेसला आघाडी करण्यात स्वारस्यच नव्हते. गेले दोन महिने ‘आप’ने काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत प्रयत्न केले. पण, आता मोदी-शहा  या दोघांना सत्तेवर आली तर त्याची जबाबदारी राहुल गांधी यांचीच राहील.

देशाच्या राजधानीतील जनतेला महाविद्यालये आणि नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण, शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, पोलीस सुधारणा, शून्य भ्रष्टाचार, नोकऱ्या, जमीन आणि गृहनिर्माण, स्वच्छता, परिवहन, प्रदूषण आदी मुद्द्यावरून  जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले आहे.