मोदींच्या वडिलांबाबत कुणालाच माहिती नाही, ते राहुल गांधींकडे हिशेब मागतायेत; विलास मुत्तेमवारांचे वादग्रस्त विधान

0
929

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मागील चार-पाच पिढ्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ज्या पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत कुणालाच काही माहिती नाही, ते राहुल गांधींकडे हिशेब मागत आहेत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी राजस्थानमधील एका बैठकीत केले आहे.  या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये एका बैठकीत त्यांनी हे विधान केले असून  भाजपने मुत्तेमवार यांचा हा व्हिडीओ ट्विट करुन त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते सी.पी. जोशी यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान  मोदी यांच्या जातीचा उल्लेख केल्याचा वाद ताजा असताना आता मोदींच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याने मुत्तेमवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार पंकज प्रताप सिंह यांच्या कार्यालयात एका बैठकीत बोलताना मुत्तेमवार यांनी हे विधान केल्याची समजते. याशिवाय भाजप सरकारने खोटे बोलण्याशिवाय इतर काहीही केलेले नाही. पंतप्रधान मोदी एक नंबरचा खोटरडा माणूस आहे, जगभरात कुठेच असा पंतप्रधान कधी पाहिला नाही, असेही मुत्तेमवार  यांनी म्हटले आहे.