मैं सबका बाप हूं… मै सबको गिराता हू, तुम चिंता मत करो – रावसाहेब दानवे  

0
639

जालना, दि. २ (पीसीबी) – रावसाहेब दानवे को गिराओ, क्योंकी सारा पैसा जालने में जा रहा है. लेकिन मैं सबका बाप हूं…तुम बस अपना अपना बूथ संभालो. में सबको गिराता हू, तुम चिंता मत करो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.  

जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासकामांच्या आढावा  बैठकीत दानवे बोलत होते. दानवे म्हणाले की, जसे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे सारे लागले आहेत, तसे माझ्याही मागे सारे लागले आहेत. मला मतदान दिले तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असे ही  दानवे यावेळी  म्हणाले.

पंतप्रधान मोदींना पाडण्यासाठी देशभरातील चोट्टे एक झालेत आणि जालन्यात मला पाडण्यासाठी जालन्यातील  चोट्टे एक झाले आहेत, असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले. त्यानंतर दानवे यांनी आपल्याला उपस्थितांना हात वर करून पाठिंबा द्यायला लावला.  हा मिळणारा प्रतिसाद पाहून कशाला निवडणूक घ्यायची, असे ते म्हणाले.