मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा

0
447

मुंबई, दि, २१ (पीसीबी) – न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत राज्य सरकारने गुरुवारी विधानसभेत अध्यादेशाचे विधेयक मंजूर केले. याबाबतचे विधेयक एकमताने मंजूर झाल्याने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

शैक्षणिक संस्था आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण लागू केले. उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणविरोधात निकाल दिला. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यानंतर सरकारने त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. राज्य सरकारने या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते सभागृहात मंजूर केले आहे.