मुळशी धरणात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
425

मुळशी, दि. २ (पीसीबी) – मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन विद्यार्थी आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास मुळशी धरणात बुडाले. यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. धरणात बुडालेले तीघेही भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. सध्या आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार असे या तिघांची नावे आहेत. ते तिघे ही २२ वर्षांचे होते.

बुधवारी हे विद्यार्थी त्यांच्या काही अन्य मित्र-मैत्रीणींसह मुळशीतील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. आज सकाळी ते मुळशी धरणात पोहण्यासाठी गेले असता ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच बुडालेल्या दोघांचा शोध सुरु आहे.