मुळशीत आढळलेला ‘तो’ मृतदेह शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुख यांचा; खून झाला असल्याची प्राथमिक शक्यता

0
424

मुळशी, दि.१० पीसीबी) : चिंचवडमधील शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा मृतदेह गावकऱ्यांना मुळशी खुर्द येथे हॉटेल दिशाजच्या जवळ सकाळी आढळला. मात्र तेथील एकूण परिस्थिती पाहता त्यांचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि तपास देखील त्याच दृष्टीने सुरु आहे. विजय सर्जेराव सुर्वे (वय 40) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कामावर जात असलेल्या लोकांनी पहिल्यांदा दारू पिऊन कोणीतरी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, मृत व्यक्ती व्यक्ती पालथी पडलेली होती व अंगातून रक्तस्त्राव होत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली. तेव्हा तातडीने पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलीस हवालदार शंकर नवले, बीट अंमलदार सचिन शिंदे, पोलीस नाईक चंद्रशेखर हगवणे, पोलीस पाटील आकाश कांबळे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाची पाहणी आणि इतर तपास केला असता या मृत व्यक्तीचे नाव विजय सर्जेराव सुर्वे असून ते चिंचवड येथील मोहननगरचे माजी शाखाप्रमुख असल्याचे समोर आले.